वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आमची शाळा किंवा अभ्यासक्रमांबद्दल तुम्हाला प्रश्न आहेत का? आमच्या या FAQ विभागात तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.

ऑनलाइन शाळेबद्दल प्रश्न

अभ्यासक्रमातील नोंदणीबद्दलचे प्रश्न

पैसे देण्याबद्दलचे प्रश्न

अभ्यासक्रम घेण्याबद्दलचे प्रश्न

परीक्षांबद्दलचे प्रश्न

तांत्रिक प्रश्न

मदतीसंबंधी प्रश्न

 


ऑनलाइन शाळेबद्दल प्रश्न

प्र. या शाळेचा हेतू काय आहे?

येशूने त्याच्या लोकांना एक कामगिरी सोपविली होती: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जें काही मी तुम्हांला आज्ञापिलें तें सर्व त्यांस पाळावयास शिकवा” (मॅथ्यू 28:19, 20; NASB). थ्रू द स्क्रिप्चर्स हे पूर्णपणे संपूर्ण बायबल शिकविण्याच्या कार्यास समर्पित आहे; प्रत्येक देशातील त्यांच्यासाठी जे शिकण्यास तयार आहेत.

प्र. अभ्यासक्रम कुठे शिकविला जातो?

अभ्यासक्रम हे वाचनावर आधारित आहेत आणि पूर्णपणे ऑनलाइन केले जातात. जर तुम्हाला इंटरनेट पर्यंत प्रवेश असेल तर, हे अभ्यासक्रम तुमच्यासाठी आहेत तुम्ही कुठेही असलात तरीही.

प्र. ही शाळा केवळ उपदेशक होणार्‍यांच्या शिक्षणासाठी आहे का?

जरी आम्ही बायबलसंबंधी मजबूत आणि सखोल पाया पुरवीत असलो, तरी थ्रू द स्क्रिप्चर्सचा हेतू “उपदेशक शाळा” बनणे हा नाही. ही शाळा प्रभूच्या शब्दांबद्दल अधिक जाणू इच्छित असणार्‍या प्रत्येकासाठी आरेखित केलेली आहे.

प्र. अभ्यासक्रमात नोंदणी करण्यासाठी मी ख्रिश्चन किंवा एखाद्या विशिष्ट संप्रदायाचा सदस्य असणे गरजेचे आहे का?

नाही. तुम्ही शिकण्यासाठी तयार होऊन यावे हीच निव्वळ “आवश्यकता” आहे. “ज्याला कान आहेत तो ऐको” (मॅथ्यू 11:15).

प्र. या अभ्यासक्रमांमध्ये कोणत्या संप्रदायाची तत्वे शिकविली जातात?

या अभ्यासक्रमांमध्ये कोणताही संप्रदाय किंवा सांप्रदायिक मार्ग, कबुलीजबाब किंवा विश्वासाचे निवेदन शिकविले जात नाही. प्रेषित पॉलने सूचित केले आहे, “बंधूजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुम्हांस विनंती करितो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत, तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे” (1 करिंथकर 1:10)  जर ख्रिस्ताचे चर्च हे अशा फुटींपासून मुक्त असायला हवे असल्यास, आपण सर्वांनी एका समान आदर्शाभोवती एकत्र आलेच पाहिजे: संदेश जो प्रभूने स्वत: आपल्याला दिलेला आहे. आपल्या अभ्यासक्रमाचे लेखक हे अशा फुटीला कारणीभूत असणार्‍या परंपरा आणि माणसाच्या आवश्यकता बाजूला ठेवण्याप्रती बांधील आहेत; ते फक्त प्रभूने त्याच्या बायबलमधून आपल्याला दिलेला प्रवित्र संदेश शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. “मोठ्या मनाच्या” बिरुयांनी केले तसे करण्याची कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला करतो, “त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय हयाविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले” (कृत्ये 17:11).

प्र. थ्रू द स्क्रिप्चर्स ही एक अधिकृत शाळा आहे का?

थ्रू द स्क्रिप्चर्स ही एक अधिकृत संस्था नाही. परंतु, संपूर्ण बायबलचा अभ्यास पूर्ण केल्याबद्दल एक प्रशस्तिपत्रक हे कोठेही उच्च संदर्भात घेतले जाईल आणि बायबलचे सखोल ज्ञान कोठेही आवश्यक असते आणि त्याची प्रशंसा केली जाते.

प्र. थ्रू द स्क्रिप्चर्स अभ्यास पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेट देते का?

अभ्यासक्रमाच्या गटाच्या अंतर्गत प्रत्येक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशस्तिपत्रके दिली जातील. अभ्यासक्रमाच्या गटाचे उदाहरण म्हणजे नवीन करार इतिहास ज्यांमध्ये येशूचे जीवन, 1; येशूचे जीवन 2; मॅथ्यू 1-14; मॅथ्यू 14-28; मार्क; लुक 1:1-9:50; लुक 9:51-24:53; जॉन 1-10; जॉन 11-12 आणि कृत्ये 15-28 यांचा समावेश आहे. अभ्यासक्रमाच्या गटांबद्दल अधिक माहितीसाठी सेमिस्टर अभ्यास पान पहा.

प्र. थ्रू द स्क्रिप्चर्स धर्मोपदेशनासाठी परवाना देते का?

एखाद्याला बायबलातील उपदेश करण्यासाठी कोणताही परवाना आवश्यक नाही आणि थ्रू द स्क्रिप्चर्स कोणालाही धर्मोपदेशनासाठी प्रमाणित करीत नाही. बायबल स्वत:च प्रभूची सेवा करण्यासाठी एखाद्याला सुसज्ज करते आणि आम्ही फक्त तेच शिकवितो. “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतीशिक्षण ह्यांकरितां उपयोगी आहे, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” (2 तीमथ्य 3:16:17).

प्र. इतर अभ्यासक्रम उपलब्ध असतील का?

जसे उपलब्ध होतील तसे नवीन अभ्यासक्रम जोडले जातील. आमचे किमान ध्येय हे आहे की संपूर्ण बायबल त्याच तपशिलात पूर्ण प्रस्तुत केले जायला हवे जे सध्याच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रस्तुत केले जाते.

प्र. ही शाळा इतर भाषांमध्ये उपलब्ध आहे का?

थ्रू द स्क्रिप्चर्स हे तेवीस भाषांमध्ये उपलब्ध आहे! इंग्रजीखेरीज आम्ही अरेबिक, बंगाली, चीनी, फ्रेंच, जर्मन, गुजराथी, हिंदी, इंडोनेशियन, जपानी, कन्नड, कोरियन, मल्याळम, मराठी, नेपाळी, पोर्तुगीस, पंजाबी, रशियन, स्पॅनिश, तामिळ, तेलुगू, उर्दू आणि व्हिएतनामीज या भाषांमध्ये अभ्यासक्रम प्रस्तुत करतो. इंग्रजीत उपलब्ध असलेले सर्व अभ्यासक्रम सुरूवातीला इतर भाषांमध्ये उपलब्ध नसतील, कारण प्रत्येक अभ्यासक्रम भाषांतरित करायला थोडा वेळ लागेल. अखेरीस, निवडलेले संपूर्ण अभ्यासक्रम या सर्व भाषांमध्ये उपलब्ध होतील.

प्र. आमचे चर्च या शाळेचा उपयोग कसा करू शकते?

एका परिणामकारक कार्यक्रमासाठी स्थानिक गटातील अभ्यासाचे घटक खूपच महत्त्वाचे असू शकतात. आपल्या धार्मिक सभेमध्ये स्थानिक थ्रू द स्क्रिप्चर्स शाळेची अंमलबजावणी कशी करायची याबद्दलच्या टिप्पण्यांसाठी आमचे शाळा कशी सुरू करायची हे पान पहा.

प्र. थ्रू द स्क्रिप्चर्स ऑनलाइन शाळेच्या उभारणी मागे कोण आहे?

थ्रू द स्क्रिप्चर्स हे सर्सी, अर्कांसास येथील जागतिक ख्रिश्चन धर्मतत्त्वांना समर्पित असलेल्या एका बहुस्वरूपीय, ना-नफा संस्था, ट्रूथ फॉर टूडे, यांचे कार्य आहे.

प्र. अभ्यासक्रमाचे लेखक कोण आहेत?

बायबल शिकविण्यात ज्यांनी आपले आयुष्य समर्पित केले त्यांच्याबद्दल वाचण्यासाठी आमच्या आमच्या लेखकांबद्दल या पानाला भेट द्या.


अभ्यासक्रमातील नोंदणीबद्दलचे प्रश्न

प्र. या शाळेत अभ्यासक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी पुर्वावश्यकता कोणत्या आहेत?

कोणत्याही पुर्वावश्यकता नाहीत. आमचे अभ्यासक्रम सर्वांसाठी खुले आहेत.

प्र. कोणत्या अभ्यासक्रमांसाठी मी नोंदणी करू शकतो?

आमच्या उपलब्ध अभ्यासक्रमांपैकी कोणताही निवडण्याचा पर्याय तुम्हाला आहे. जर आपल्या मनात बायबलमधील एका विशिष्ट पुस्तकाचा अभ्यास करण्याचे नसेल तर, तुम्ही ख्रिस्ताचे जीवन, 1.येथून सुरुवात करावी असे आम्ही सुचवितो.

प्र. प्रत्येक अभ्यासक्रम किती काळ चालेल?

प्रत्येक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी, तुम्ही त्या अभ्यासक्रमात नोंदणी केल्याच्या क्षणापासून तुमच्याकडे कमाल 50 दिवस असतील.

प्र. अभ्यासक्रम केव्हा सुरू होईल?

आम्ही तुम्हाला आम्ही सुचविलेले एखादे सेमिस्टर किंवा तिमाही वेळापत्रके (अधिक माहितीसाठी सेमिस्टर अभ्यास पहा) निवडण्यासाठी सुचवितो, पान तुम्ही अभ्यासक्रम कोणत्याही वेळी सुरू करू शकता. जर तुम्ही अभ्यास गटाचा किंवा स्थानिक TTS शाळेचा भाग असाल, तर गटातील इतर सदस्यांशी संपर्कात रहा ज्यामुळे तुम्ही सर्वजण एकाच वेळी नोंदणी कराल.

प्र. मी केवळ एकच अभ्यासक्रम घेऊ शकतो का?

होय. जरी आम्हाला असे वाटते की तुम्ही एकदा सुरुवात केल्यानंतर तुम्हाला इतर अभ्यासक्रम पुढे सुरू ठेवावेसे वाटतील, तरीही विकल्प नेहमी तुमचा असेल; तुम्हाला आपोआप कोणत्याही अभ्यासक्रमात नोंदविले जाणार नाही किंवा आपोआप पैसे आकारले जाणार नाहीत.

प्र. मी एकाच वेळी एकाहून अधिक अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करू शकतो का?

आमची सिस्टिम तुम्हाला एकावेळी फक्त एकाच अभ्यासक्रम घेण्याची परवानगी देते. परंतु, तुम्हाला सध्याचा अभ्यासक्रम संपण्यासाठी पूर्ण 50 दिवस थांबण्याची गरज नाही. एकदा तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केलात की तुम्हाला पुढील अभ्यासक्रमाकडे जाण्याचा पर्याय असेल.

प्र. कोणती वेगळी क्रमिक पुस्तके किंवा इतर साहित्य मी मिळविणे गरजेचे आहे का?

अभ्यासक्रमासाठी तुम्हाला गरजेचे असणारे सर्वकाही पुरविले जाईल. तुमच्याकडे केवळ इंटरनेटशी जोडण्याचे माध्यम आणि शिकण्याची इच्छा असणे गरजेचे आहे. आम्ही हे जोरकसपणे सुचवितो की तुमच्याकडे बायबलची प्रत असावी, पण प्रत्येक अभ्यास मजकुरात अभ्यासल्या जाणार्‍या धर्मग्रंथाचा भाग समाविष्ट असतो.

प्र.  वैयक्तिक निवड आणि सेमिस्टर अभ्यास यांमध्ये काय फरक आहे?

वैयक्तिक निवड हा पर्याय त्या व्यक्तीसाठी अभिप्रेत आहे ज्याला कोणता अभ्यासक्रम घ्यायचा आहे हे आधीच माहिती आहे किंवा जो अभ्यासक्रमांमध्ये त्याच्या स्वत:च्या क्रमांचे पालन करू इच्छितो. सेमिस्टर अभ्यास हा पर्याय त्या व्यक्तीसाठी अभिप्रेत आहे ज्याला एका सुसंघटित आराखड्याचे पालन करायचे आहे जेणेकरून अंतिमत: संपूर्ण बायबलचा अभ्यास करायचं आहे. प्रत्यक्षातील खरा फरक फक्त इतकाच आहे की वैयक्तिक निवड तुम्हाला तुमचा पहिला अभ्यासक्रम निवडण्याची परवानगी देते तर, सेमिस्टर अभ्यास तुमच्यासाठी पहिला अभ्यासक्रम निवडतो. तांत्रिक दृष्ट्या इतर सर्व बाबतीत ते समान आहेत. आम्ही वेगवेगळ्या शिफारसींच्या संचांसह दोन पर्याय प्रस्तुत करतो, फक्त हे स्पष्ट करण्यासाठी की वेगवेगळ्या गरजा असलेल्या लोकांकडून शाळेचा कसा वापर केला जाऊ शकतो.

प्र. जर मी वैयक्तिक निवडीच्या अंतर्गत अभ्यासक्रम सुरू केला तर, मी नंतर सेमिस्टर अभ्यासांमध्ये बदली करू शकतो का?

बदली करण्याची गरज नाही. एकदा तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केलात की, शाळा तुम्हाला पुढील अभ्यासक्रम सुचवेल आणि तुम्ही प्राधान्य देत असल्यास, वेगळा अभ्यासक्रम निवडण्याचा पर्याय तुम्हाला असेल. एकदा गटामधील सर्व अभ्यासक्रम पूर्ण केले की दोन्ही पर्याय प्रशस्तिपत्रकासाठी पात्र आहेत.

प्र. जर मी सेमिस्टर अभ्यासांच्या अंतर्गत अभ्यासक्रम सुरू केला तर, मी नंतर नियमबाहय वेगळा अभ्यासक्रम निवडू शकतो का?

होय. प्रत्येक अभ्यासक्रमानंतर, शाळा तुम्हाला पुढील अभ्यासक्रम सुचवेल आणि तुम्ही प्राधान्य देत असल्यास, वेगळा अभ्यासक्रम निवडण्याचा पर्याय तुम्हाला असेल. निवड नेहमी तुमचीच असेल.

प्र. मी पालन करू इच्छित असलेल्या सेमिस्टर किंवा क्वार्टरची गती मी कुठे निवडू शकतो?

सेमिस्टर आणि तिमाही वेळापत्रके (सेमिस्टर अभ्यास पानावरील) या केवळ तुमच्यासाठी तुमच्या इच्छेनुसार पालन करण्यासाठी केलेल्या शिफारसी आहेत. तुम्हाला वेबसाइटवरील एक निवडण्याची कधीही गरज पडणार नाही.

प्र. जर मी 50-दिवसांच्या मर्यादित कालावधीत माझा अभ्यासक्रम पूर्ण करू शकलो नाही तर काय?

जर तुम्ही 50-दिवसांच्या मर्यादित कालावधीत तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकला नाहीत तर, तुम्ही कमी केलेल्या किंमतीतील 30-दिवसांचा विस्तार विकत घेऊ शकता. विस्तार केवळ सुरुवातीचे 50 दिवस संपल्यानंतरच विकत घेता येऊ शकतो. प्रती अभ्यासक्रमाला परवानगी दिलेल्या विस्तारांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही.

प्र. मी अभ्यासक्रम पूर्ण करण्याआधी माझा अभ्यासक्रमापर्यंतचा प्रवेश समाप्त झाला तर काय? उरलेला पूर्ण करण्यासाठी मी नंतर परत येऊ शकतो का?

अभ्यासक्रमापर्यंतचा प्रवेश समाप्त झाल्यानंतर जरी थोडा काळ गेला असेल, तरी तुम्ही जिथून सोडून दिले तिथून पुढे सुरू ठेवण्यासाठी तुमच्याकडे 30-दिवसांचा विस्तार विकत घेण्याचा पर्याय असेल.


पैसे देण्याबद्दलचे प्रश्न

प्र. अभ्यासक्रमात नोंदणी करण्यासाठी मला पैसे द्यावे लागतील का?

होय. थ्रू द स्क्रिप्चर्स हे बायबल शिकविण्याला आणि जागतिक ख्रिश्चन धर्मतत्त्वांना समर्पित असलेल्या एक बहुस्वरूपीय, ना-नफा संस्था, ट्रूथ फॉर टूडे, यांचे कार्य आहे. या आवाक्याच्या कार्यक्रमाला मोठा खर्च येतो. तुम्ही खरेदी करीत असलेल्या प्रत्येक अभ्यासक्रमासह, तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाची देखरेख ठेवण्यात आणि उचलून धरण्यात, नवीन साहित्य उत्पन्न करण्यात आणि हे साहित्य इतर भाषांमध्ये भाषांतरित करण्यात सहाय्य कराल, ज्यामुळे इतर भाषांमधील लोकही तुमच्यासारखेच उत्तम अभ्यासक्रम शिकू शकतील.

प्र. अभ्यासक्रमात नोंदणी करण्यासाठी किती खर्च येतो?

प्रत्येक अभ्यासक्रमासाठीची किंमत “नोंदणी” बटणासहित स्पष्टपणे दर्शविली आहे आणि तुम्हाला दिसत असलेली किंमतच आम्ही आकारू ती किंमत असेल. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी दर्शविलेल्या किंमतीखेरीज आम्ही इतर कोणतेही शुल्क आकारणार नाही. तुम्ही जगातील ज्या ठिकाणाहून आमच्या साइटपर्यंत पोहोचत आहात त्यानुसार किंमत बदलेल. आम्ही प्रत्येक देशाच्या सरासरी आर्थिक मार्गांचा काळजीपूर्वक विचार करून आमच्या किंमती ठरविल्या आहेत, कारण आम्ही हा कार्यक्रम प्रस्तुत करण्याच्या खर्चात समतोल राखण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरून ज्यांना बर्‍याच काळापासून बायबलचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. या बाबतीत तुमच्या समजून घेण्याची आम्ही प्रशंसा करतो.

प्र. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी मला केव्हा पैसे द्यावेच लागतील?

जेव्हा तुम्ही त्या अभ्यासक्रमात तुम्ही नोंदणी करण्यासाठी तयार असाल त्यावेळी तुम्हाला प्रत्येक अभ्यासक्रमासाठी वैयक्तिकरित्या पैसे द्याल. तुमची इतर अभ्यासक्रमांसाठी कधीही आपोआप नोंदणी केली जाणार नाही किंवा आपोआप आकारले जाणार नाही.

प्र. पैसे देण्याच्या कोणत्या पद्धती उपलब्ध आहेत?

आम्ही व्हिसा, मास्टर कार्ड, अमेरिकन एक्सप्रेस, जेसीबी, डिस्कव्हर आणि डायनर्स क्लब स्वीकारतो. जर तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डावर खालीलपैकी एक लोगो असल्यास, तुमचे कार्ड आमच्या अभ्यासक्रमांमध्ये नोंदणी करण्यासाठी वापरता येऊ शकते:

visa master card amex jcb discover diners

प्र. जर मी यूएस डॉलर्सखेरीज वेगळे चलन वापरत असल्यास मी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरू शकतो का?

बर्‍याचशा बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला विदेशी चलनात खरेदी करण्याची परवानगी देतात आणि तुमच्या कार्डाला आकारला गेलेला खर्च तुमच्या चलनासाठी समायोजित केला जाईल. हे लक्षात घ्या की तुमचे कार्ड तुम्हाला चलनाच्या विनिमयासाठी बहुदा छोटे शुल्क आकारू शकेल.


अभ्यासक्रम घेण्याबद्दलचे प्रश्न

प्र.  मी अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर काय अपेक्षा करू शकतो?

अभ्यासक्रम वाचनावर आधारित आहेत आणि ते एक डिजिटल पुस्तकाभोवती केंद्रित असतील ज्याला आम्ही “अभ्यास मजकूर” म्हणतो. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 50 दिवस असतील, पण तुमचा वेग किती ठेवायचा हे तुमच्यावर अवलंबून असेल. अधिक माहितीसाठी आमचे नमूना अभ्यासक्रम सामग्री पान पहा.

प्र. अभ्यासक्रम सामग्रीचे नमुने आहेत का?

होय! आमचे नमूना अभ्यासक्रम सामग्री पान पहा.xx

प्र. अभ्यासाचा मजकूर काय असेल?

प्रत्येक अभ्यासक्रमासाठी अभ्यासाचा मजकूर हे PDF फाइल सारखे एक डिजिटल पुस्तक आहे जे ट्रूथ फॉर टुडे भाष्य श्रेणीतील एका खंडातून आलेले असेल. छापील स्वरुपातील 350 आणि 700 पाने असलेल्या या खंडांमध्ये, धर्मग्रंथातील स्पष्टीकरणे आणि विनियोग यांचा समावेश असेल. अभ्यास मजकूर येणार्‍या अनेक वर्षांसाठी तुमच्या धार्मिक संग्रहालयाचा एक अमूल्य भाग असेल.

प्र. प्रत्येक अभ्यासक्रमाच्या शेवटी मी अभ्यासाच्या मजकुराचे काय करू?

अभ्यास मजकूर आणि इतर डाऊनलोड करण्याचे साहित्य जे तुम्हाला अभ्यासक्रमादरम्यान मिळालेले असेल ते तुमच्याकडेच ठेवण्यासाठी असेल आणि अभ्यासक्रमानंतर वापरण्यासाठी असेल. प्रत्येक अभ्यासक्रम संपण्यापूर्वी या फाइल्स तुमच्या कॉम्प्युटरवर जतन करण्याची खात्री करा.

प्र. अभ्यासाच्या मजकूरची छापील प्रत मिळविणे शक्य आहे का?

पुस्तक स्वरूपातल्या अभ्यास मजकुराच्या छापील प्रती केवळ इंग्रजीत उपलब्ध आहेत. यूनायटेड स्टेट्स मधील विद्यार्थी जे इंग्रजीतून अभ्यासक्रम घेतात त्यांना प्रत्येक अभ्यासक्रमासाठी त्यांच्या डिजिटल प्रतीच्या जोडीला आपोआप एक छापील पुस्तक मिळेल. छापील पुस्तक आणि ते शिपिंग करण्याचा खर्च अभ्यासक्रमाच्या यू.एस. किंमतीमध्ये समाविष्ट आहेत. अभ्यासक्रमात नोंदणी करताना तुम्हाला तुमचा शिपिंग करण्याचा पत्ता देण्यास सांगितले जाईल. कृपया हे लक्षात घ्या की अभ्यासक्रमाचे 50 दिवस नोंदणीच्या वेळेपासून सुरू होतील. त्यामुळे आम्ही हे सुचवितो की तुम्ही अभ्यास सुरू करण्यासाठी तुमची छापील प्रत मिळेपर्यंत थांबू नका. आंतर्राष्ट्रीय शिपिंगच्या जास्त खर्चामुळे, यूनायटेड स्टेट्सच्या बाहेरील विद्यार्थ्यांना केवळ डिजिटल अभ्यास मजकूर मिळेल. जर आंतर्राष्ट्रीय शिपिंगचा जास्त खर्च असूनही तुम्ही इंग्रजीतील छापील प्रत विकत घेऊ इच्छित असाल तर, तुम्ही रिसोर्स पब्लिकेशन्स यांच्याशी staff@resourcepublications.net येथे ईमेल पाठवून किंवा 1-501-305-1472 येथे फोन करून संपर्क करू शकता (तुम्हाला तुमच्या देशाचा एक्झिट कोड फोन नंबरच्या सुरूवातीला जोडणे गरजेचे असेल).

प्र. अभ्यासाच्या मजकुराची प्रत मी माझ्यासाठी छापून घेऊ शकतो का?

तुम्ही अभ्यासाच्या मजकुराची प्रत तुमच्या स्वत:च्या वापरासाठी छापून घेऊ शकता. तुम्ही अभ्यास मजकूर दुसर्‍या कोणालाही कॉपी करून देऊ शकत नाही. हे लक्षात घ्या की प्रत्येक अभ्यास मजकूर हा अनेक हजारो पानांचा आहे, त्यामुळे तो स्वत: छापून घेणे खर्चिक असेल.

प्र. अभ्यासक्रमांना श्रेणी कशी दिली जाते?

अभ्यासक्रमातील तुमची प्रगती पाच विभाग परीक्षा आणि एका अंतिम, सर्वसमावेशक परीक्षेमार्फत मोजली जाते. तुमची अंतिम अभ्यासक्रम श्रेणी ही सर्व सहा परिक्षांची सरासरी असेल.

प्र. माझ्या श्रेणींची नक्कल उपलब्ध असते का?

होय. जेव्हा तुम्ही साइटवर लॉगिन करता तेव्हा वेबपेजच्या वरील उजवीकडील माझे खाते या मेनूच्या खाली तुम्हाला माझ्या श्रेणी सापडू शकतील.

प्र. मी इतर विद्यार्थ्यांशी कसा संवाद साधू शकतो?

तुम्ही वेबसाइटवरून थेट इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकणार नाही, पण आम्ही तुम्हाला तुम्ही इतर विद्यार्थ्यांसह एका स्थानिक TTS शाळेत किंवा अभ्यास गटात सामील होण्यासाठी जोरदार प्रोत्साहन देतो. टिप्पण्या आणि सूचनांसाठी शाळा कशी सुरू करायची हे पहा.


परीक्षांबद्दलचे प्रश्न

प्र. किती परीक्षा घेतल्या जातील?

प्रत्येक अभ्यासक्रमासाठी पाच विभाग परीक्षा आणि एका अंतिम, सर्वसमावेशक परीक्षा आहेत.

प्र. प्रत्येक परीक्षा मी कधी देईन?

परीक्षा देण्यासाठी ठरविलेली वेळ नाही. तुम्ही प्रत्येक विभागासाठी साहित्य वाचल्यानंतर आणि अभ्यासल्यानंतर, जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा कधीही तुम्ही परीक्षा देऊ शकता. हे लक्षात ठेवा की सर्व सहा परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे 50 दिवस असतील. तुम्हाला मागोवा घेण्यात मदत करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक वेग मार्गदर्शक पुरवू ज्यामुळे तुम्ही नेमलेल्या वेळेत सर्व सहा परीक्षा दिल्याची खात्री करू शकाल.

प्र. प्रत्येक परीक्षेत किती प्रश्न असतील?

प्रत्येक परीक्षेत कमाल 50 प्रश्न असतील जे संभाव्य प्रश्नांच्या मोठ्या संग्रहातून आपोआप निवडलेले असतील.

प्र. परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील?

परीक्षेतील प्रश्न हे बहुविध पर्याय आणि चूक/बरोबर प्रश्न यांचे मिश्रण असतील. बहुविध पर्यायाच्या प्रश्नांमध्ये, आम्ही प्रश्न विचारू आणि विविध पर्यायांमधून तुम्हाला बरोबर प्रतिसाद निवडायला सांगू. चूक/बरोबर प्रश्नांमध्ये, आम्ही एक विधान करू आणि तुम्हाला तुम्ही जे शिकला आहात त्याच्या आधारावर हे ओळखायचे आहे की ते विधान बरोबर किंवा चूक आहे. काही नमूना प्रश्न पाहण्यासाठी नमूना अभ्यासक्रम सामग्री पान पहा.

प्र. परीक्षेत कोणते साहित्य समाविष्ट असेल?

प्रत्येक विभागासाठी, आम्ही तुम्हाला ती पाने नेमून देऊ जी तुम्हाला वाचायची आहेत आणि आम्ही त्या पानांमधून प्रश्न काढू. नेमलेल्या वाचनातील “विनियोग” किंवा “पुढील अभ्यासासाठी” या विभागांमधील, किंवा भाष्य अभ्यास मजकुराव्यतिरिक्त कोणत्याही अभ्यासक्रम साहित्यातील प्रश्न येणार नाहीत. सर्वसमावेशक परीक्षेत सर्व पाच विभाग परीक्षांमधील त्याच साहित्याचा समावेश असेल.

प्र. परीक्षांना श्रेणी कधी दिल्या जातील?

तुम्ही परीक्षा पूर्ण केल्यानंतर आणि “उत्तरे पाठवा” क्लिक केल्यानंतर त्वरित परीक्षांना श्रेणी दिल्या जातील.

प्र. गमावलेल्या परीक्षांचे प्रश्न मला पाहता येऊ शकतील का?

होय. तुम्ही कोणते प्रश्न गमावलेले आहेत हे आम्ही ओळखू कारण की ही तुमच्यासाठी शिकण्याची एक उत्तम संधी आहे. अभ्यास मजकुराच्या त्या भागात जिथे उत्तर सापडू शकते तिथे पुन्हा पाहून, या संधीचा चांगला उपयोग करा. शिवाय हे लक्षात ठेवा की तोच प्रश्न सर्वसमावेशक परीक्षेत पुन्हा येऊ शकतो.

प्र. परीक्षेला ठराविक वेळ दिलेला असेल का?

नाही. प्रत्येक प्रश्नाचा काळजीपूर्वक विचार करण्यासाठी तुम्हाला गरज असेल तेव्हा वेळ तुम्ही घ्यावा यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो.

प्र. परीक्षांची तयारी करण्यात मदत होण्यासाठी अभ्यास मार्गदर्शक असेल का?

होय. पाच अभ्यास मार्गदर्शक आहेत ज्यांमध्ये महत्त्वाच्या संज्ञा आणि आशय समाविष्ट आहेत जे तुम्हाला परीक्षेसाठी माहीत असायला हवेत. सर्वसमावेशक परीक्षेसाठी तुम्हाला सर्व पाच अभ्यास मार्गदर्शकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. नमूना अभ्यास मार्गदर्शकासाठी आमचे नमूना अभ्यासक्रम आशय पान पहा.

प्र. मी परीक्षा देताना माझे बायबल, टिप्पण्या किंवा इतर मदत वापरू शकतो का?

नाही, तुम्ही परीक्षा सुरू होण्यापूर्वी तुमचे बायबल, टिप्पण्या आणि अभ्यास साहित्य बाजूला ठेवायलाच हवे.

प्र. पुढील विभागाकडे जाण्यासाठी परीक्षेत मला किती गुण मिळायलाच हवेत?

पुढील विभागाकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेत किमान 70% गुण मिळायलाच हवेत. आपल्या शाळेचे ध्येय तुम्ही साहित्य शिकावे हे असल्यामुळे, तुम्हाला पुढे शिकण्याची संधी मिळेल आणि जर तुम्हाला 70% हून कमी गुण मिळाले तर तुम्ही पुन्हा परीक्षा द्या. तुम्ही परीक्षा देता त्या प्रत्येक वेळी प्रश्न आपोआप निवडले जातील, त्यामुळे काही प्रश्न तुम्ही पहिल्यांदा परीक्षा दिली त्यासारखेच नसतील. पुढील विभागाकडे जाण्यासाठी गरजेनुसार तुम्ही कितीही वेळा परीक्षा पुन्हा देऊ शकता, पण तुम्ही जोरदार अभ्यास करावा आणि पहिल्यांदा उत्तीर्ण व्हावे यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो कारण की सिस्टिम तुम्ही किती वेळा पुन्हा परीक्षा दिलीत याचा मागोवा घेते. हे लक्षात घ्या की सर्वसमावेशक परीक्षा पुन्हा देण्याची संधी तुम्हाला मिळणार नाही.

प्र. जर मी परीक्षा 70% किंवा त्याहून अधिक गुणांनी आधीच उत्तीर्ण झालो असल्यास मी पुन्हा देऊ शकतो का?

नाही. एकदा का तुम्ही परीक्षा किमान 70% सह उत्तीर्ण झालात, की ती श्रेणी अंतिम असते.

प्र. मी सर्वसमावेशक परीक्षा पुन्हा कशी देऊ शकतो?

तुम्हाला साहित्य शिकण्यात मदत होण्यासाठी आम्ही तुम्हाला पाच विभाग परीक्षा पुन्हा देण्याची संधी देतो. परंतु, जरी तुम्हाला 70% हून कमी गुण मिळाले असले तरी, तुम्ही सर्वसमावेशक परीक्षा पुन्हा देऊ शकत नाही. ही अंतिम परीक्षा हे तुम्ही अभ्यासक्रमातून काय घेतलेत याचे खरे मोजमाप असते.

प्र. परीक्षेच्या दरम्यान कॉम्प्युटर बिघडला किंवा इंटरनेट कनेक्शन गेले तर काय घडते?

एकदा समस्या सुटल्यानंतर तुम्ही परीक्षा पुन्हा सुरू करू शकाल. जर तुमचे इंटरनेट कनेक्शन अधूनमधून खंडित होत असेल तर, तुम्ही ऑफलाइन असताना परीक्षा देणे सुरू ठेवू शकता आणि त्यानंतर कनेक्शन पुन्हा आल्यावर तुमची उत्तरे पाठवू शकता.


तांत्रिक प्रश्न

प्र. ही वेबसाइट वापरण्यासाठी किमान कॉम्प्युटर आवश्यकता कोणत्या आहेत?

आमची वेबसाइट प्रमुख ब्राऊजर्स (Google Chrome, Firefox, Internet Explorer, Opera, किंवा Safari)) च्या किमान तीन नवीन आवृत्त्यांशी सुसंगत असणारी डिजाइन केली आहे. जर तुमचा कॉम्प्युटर या ब्राऊजर्सपैकी एकाशीही सुसंगत असेल तर, तुम्ही ऑनलाइन शाळेत प्रवेश करू शकता. एक सर्वसाधारण खूण म्हणजे, जर तुम्ही या साइटवरील सार्वजनिक पाने तुमच्या कॉम्प्युटरवर पाहू शकलात आणि जर तुम्ही नमूना अभ्यासक्रम साहित्य डाऊनलोड करू शकलात आणि पाहू शकलात तर, तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरसह ऑनलाइन शाळेत प्रवेश करता येऊ शकेल.

प्र. इंटरनेट कनेक्शनपासून दूर असल्यास मी अभ्यास करू शकतो का?

फाइल्स डाऊनलोड करण्यासाठी, परीक्षा देण्यासाठी आणि अभ्यासक्रमात प्रगती करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट कनेक्शन गरजेचे असेल. तुम्ही तुमचा बराचसा वेळ अभ्यास मजकूर वाचण्यात आणि परीक्षेची तयारी करण्यात घालवाल आणि एकदा तुम्ही विशिष्ट विभागासाठी अभ्यास मजकूर आणि अभ्यास मार्गदर्शक डाऊनलोड केलेत की तुम्ही हे ऑफलाइन करू शकता.

प्र. थ्रू द स्क्रिप्चर्ससह अभ्यास करण्यासाठी मी माझा टॅब्लेट किंवा मोबाइल साधन वापरू शकतो का?

आमची वेबसाइट प्रमुख ऑपरेटिंग सिस्टिम्स (जसे की Android आणि  iOS) च्या किमान तीन नवीन आवृत्त्यांशी सुसंगत असणारी डिजाइन केली आहे. त्याशिवाय, तुम्हाला PDF फाइल्स पाहू शकणे गरजेचे आहे ज्यासाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत, ज्यांमधील अनेक मोफत आहेत. जर तुमचा स्मार्टफोन किंवा टॅब्लेट हे निकष पूर्ण करीत असेल तर, तुम्ही त्याचा वापर या ऑनलाइन शाळेसाठी करू शकाल. एक सर्वसाधारण खूण म्हणजे, जर तुम्ही या साइटवरील सार्वजनिक पाने तुमच्या साधनावर पाहू शकलात आणि जर तुम्ही नमूना अभ्यासक्रम साहित्य डाऊनलोड करू शकलात आणि पाहू शकलात तर, तुम्हाला तुमच्या साधनासह ऑनलाइन शाळेत प्रवेश करता येऊ शकेल.

प्र. माझ्या खात्याशी संबंधित माझा पासवर्ड किंवा ईमेल पत्ता मी बदलू शकतो का?

तुम्ही येथे तुमचा ईमेल पत्ता किंवा पासवर्ड बदलू शकता.

प्र. मी अभ्यासातील मजकूर पाहू शकत नाही किंवा तो बरोबर दाखविला जात नाही. मी काय करायचे?

डिजिटल अभ्यास मजकूर PDF स्वरुपात उपलब्ध आहेत. या फाइल्स उघडण्यासाठी तुम्हाला PDF रीडर गरजेचा असेल. जर तुम्हाला PDF उघडण्यात समस्या येत असेल किंवा तुम्हाला मजकुराच्या ठिकाणी पांढरे चौकोन अशा चुका दिसत असतील तर, आम्ही तुम्हाला अॅडॉब रीडरची नवीन आवृत्ती येथून डाऊनलोड करण्याचे सुचवितो.

प्र. वेबसाइट बरोबर काम करीत नाही. मी काय करायचे?

पहिल्यांदा याची खात्री करा की तुम्ही Google Chrome, Firefox, Safari, किंवा Opera ची नवीन आवृत्ती वापरत आहात. जर समस्या कायम राहिली तर, कृपया आमच्या सहाय्य या पानावर चूक कळवा. कृपया नेमकी चूक कळवा. तुम्ही वापरत असलेल्या ब्राऊजरची आवृत्ती, कॉम्प्युटरवरील ऑपरेटिंग सिस्टिम (उदाहरणार्थ, Windows 8 किंवा Mac OS 10.10 Yosemite), समस्या आलेल्या पानाचा वेब पत्ता, समस्येचे वर्णन आणि तुम्ही केलेल्या कोणत्याही कृती ज्यामुळे समस्या आलेली असू शकते या माहितीचा समावेश करा.

प्र. माझ्या वैयक्तिक माहितीचे रक्षण केले जाईल का?

तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहावी याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्व पावले उचलतो. तुमच्या कॉम्प्युटरपासून आमच्या वेबसाइटपर्यंतचे डेटा कनेक्शन हे SSL तंत्रज्ञानाने सांकेतिक लिपीबद्ध आणि सुरक्षित केलेले आहे. तुमची आर्थिक माहिती आमच्या सर्व्हर्सवर कधीही साठविली जाणार नाही आणि तुमचे पैसे भरणे हे एका विश्वासार्ह, उद्योग-प्रमाणित पेमेंट प्रोसेसरकडून हाताळले जाते.


मदतीसंबंधी प्रश्न

प्र. मी सुरू केलेल्या अभ्यासक्रमात मी पुन्हा सुरुवात कशी करू शकतो?

जर तुम्ही अद्याप लॉगिन केलेले नसेल तर, या वेबपेजच्या वरच्या भागातील उजवीकडील लॉगिन लिंक वर क्लिक करून लॉगिन करा किंवा जर तुम्ही आधीच लॉगिन केलेले असेल तर, या वेबपेजच्या वरच्या भागातील उजवीकडील माझे खाते वर क्लिक करा. माझे खाते पानावरून, अभ्यासक्रम चालू ठेवा असे लिहीलेल्या लाल बटणावर क्लिक करा. हे तुम्हाला तुमच्या सध्याच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या पानावर घेऊन जाईल. तेथून, तुम्ही ती पायरी निवडू शकता जेथे तुम्ही सोडून दिले होते.

प्र. मी आधीच पूर्ण केलेला अभ्यासक्रम मी पुन्हा घेऊ शकतो का?

नाही. परंतु, तुम्ही जे आधी शिकलात त्याची पुन्हा उजळणी करण्याची जेव्हा तुमची इच्छा असेल तेव्हा अभ्यास मजकुर तुम्ही पुन्हा पाहावा यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो.

प्र. माझी अभ्यासाच्या मजकुराची डिजिटल प्रत हरविली आहे. मी दुसरी प्रत कशी डाऊनलोड करू शकतो?

तुम्ही सध्या अभ्यासक्रमात नोंदणी केलेली असताना सर्व अभ्यासक्रम साहित्यापर्यंत तुम्हाला पूर्ण प्रवेश असेल. तुम्ही तुमच्या सध्याच्या अभ्यासक्रमातील सुरुवात करणे या पानावरून अभ्यास मजकूर पुन्हा डाऊनलोड करू शकता. सर्व डाऊनलोड केलेल्या फाइल्स तुमच्या कॉम्प्युटरवर एका सुरक्षित ठिकाणी जतन करण्याची खात्री करा ज्यामुळे तुमचा प्रवेश समाप्त झाल्यानंतरही त्या तुमच्याकडे असतील. कॉम्प्युटर बंद पडल्यास त्या गमावणे टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला त्यांच्या बॅकअप प्रती ठेवण्याचे सुचवितो.

प्र. माझी अभ्यासाच्या मजकुराची डिजिटल प्रत हरविली आहे आणि माझा अभ्यासक्रमाचा प्रवेश समाप्त झाला आहे. मी दुसरी प्रत कशी डाऊनलोड करू शकतो?

अभ्यासक्रम संपल्यानंतर साहित्यापर्यंत प्रवेश मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे थोडे शुल्क भरून अभ्यासक्रमाचे नूतनीकरण करणे. तुम्ही माझे खाते पानावरून तसे करू शकता. जर तुम्ही सध्या दुसर्‍या अभ्यासक्रमात नोंदणी केली असेल तर, तुम्ही दुसर्‍या अभ्यासक्रमासाठी नूतनीकरण करण्यापूर्वी, पहिल्यांदा तो अभ्यासक्रम पूर्ण करायलाच हवा कारण तुम्ही एका वेळी केवळ एकाच अभ्यासक्रमासाठी नोंदणी करू शकता. एकदा तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाचे नूतनीकरण केलेत की तुम्ही हरविलेल्या फाइल्स डाऊनलोड करण्यासाठी अभ्यासक्रमातील कोणत्याही पानांना पुन्हा भेट देऊ शकता.

प्र. मी माझा पासवर्ड विसरलो आहे. मला माझे खाते पुन्हा कसे मिळेल?

तुम्ही येथून तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता. एकदा तुम्ही तुमचा ईमेल पत्ता किंवा वापरकर्ता नाव प्रविष्ट केलेत की आम्ही तुम्हाला तुमचा पासवर्ड रिसेट करण्याच्या लिंकसह एक ईमेल पाठवू.

प्र. मी साइन अप करताना वापरलेल्या ईमेल खात्यापर्यंत आता मला प्रवेश नाही. मी माझ्या खात्याकडे परत कसा जाऊ शकतो?

जर तुम्हाला तुमच्या जुन्या ईमेल खात्यात आता प्रवेश नसेल, तरीही तुम्ही तुमचा जुना ईमेल पत्ता प्रविष्ट करून वेबसाइटमध्ये लॉगिन करू शकता. त्यानंतर, माझे खाते पानावर,तुमच्या खात्यावर एक नवीन ईमेल पत्ता टाकण्यासाठी तुमचा पासवर्ड आणि खाते तपशील संपादित करा निवडा. त्यानंतर तुम्ही तुमच्या नवीन ईमेल पत्त्यासह वेबसाइटवर लॉगिन कराल.

प्र. मी माझे खाते दुसर्‍या कोणाशी शेअर करू शकतो का?

नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याचे किंवा तिचे स्वत:चे खाते असणे गरजेचे आहे.

प्र. मी माझे खाते दुसर्‍या कोणाला ट्रान्सफर करू शकतो का?

नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याचे किंवा तिचे स्वत:चे खाते असणे गरजेचे आहे.

प्र. मला सहाय्य कुठे मिळू शकेल?

आम्ही तुमच्या प्रश्नाचे आधीच उत्तर दिलेले नसल्याची खात्री करण्यासाठी कृपया या वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांमध्ये शोधा. जर तुम्ही एखाद्या स्थानिक TTS शाळेचा किंवा अभ्यास गटाचा भाग असाल तर, तुम्ही तुमच्या गटाच्या डीनना किंवा गटातील इतर सदस्यांपैकी एखाद्याला मदतीसाठी विचारू शकता. तरीही तुम्हाला जर मदत गरजेची असेल तर, तुम्ही आमच्या सहाय्य पानावरून आमच्याशी संपर्क करू शकता. जर तुम्ही विशेषत: इंग्रजीखेरीज इतर भाषेत आम्हाला लिहिलेत तर कृपया प्रतिसाद देण्यासाठी आम्हाला जास्त दिवस द्या.