शाळा कशी सुरू करायची

थ्रू द स्क्रिप्चर्स (TTS) शाळा तुमच्या राहत्या ठिकाणच्या धार्मिक सभेत किंवा समाजात स्थापित करण्यात तुम्हाला स्वारस्य आहे का? तुम्हाला सुरुवात करण्यासाठी येथे काही कल्पना दिलेल्या आहेत!


मी एक स्थानिक थ्रू द स्क्रिप्चर्स (TTS) शाळा माझ्या धार्मिक सभेत किंवा समाजात स्थापित का करायला हवी?

थ्रू द स्क्रिप्चर्स ही विद्यार्थ्यांना त्याच्या किंवा तिच्या स्वत:च्या वेगाने शिकू शकण्याची परवानगी देण्यासाठी डिजाइन केलेली असली तरीही, सांघिक वातावरणात एकत्र शिकण्याचा अनेक लोकांना फायदा होतो. केवळ सहभागिता आणि परस्पर सद्भाव हेच फायदे नव्हे तर, गटातील गतीशीलतेमुळे अनेक मार्गांनी लोकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळते जी वैयक्तिक अभ्यासात मिळत नाही. एक स्थानिक TTS शाळा मानवी घटक पुरवू शकते ज्याने खूप फरक पडू शकतो.


शाळा स्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या रूपरेखा कोणत्या आहेत?

 • एक प्रमाणित-वेगाची शाळा स्थापित करा जेथे चर्चमधील सदस्य प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 50 दिवसांच्या नियमित वेगाने संपूर्ण बायबल पूर्ण करण्याचे काम हाती घेतील. अधिक माहितीसाठी सेमिस्टर अभ्यास पान पहा.
 • एक पूर्ण-वेळ शाळा स्थापित करा जेथे विद्यार्थी दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांचा पूर्ण वेळ बायबलचा अभ्यास करण्यासाठी संपूर्णपणे देतील. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 14 दिवस यानुसार, विद्यार्थी बायबलच्या प्रत्येक पुस्तकाचा सखोल अभ्यास किमान दोन वर्षे आणि तीन महिने करून पूर्ण करू शकतील. यासाठी विद्यार्थ्यांची निष्ठा आवश्यक आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या राहण्याच्या खर्चासाठी सहाय्य देखील गरजेचे असू शकते.
 • अभ्यासक्रम गरजेनुसार या आधारावर संयोजित करा. सदस्य हिब्रूंवरील बायबल अभ्यास शिकविण्यासाठी तयारी करीत आहे का? त्याला आपल्या हिब्रूंवरील वर्गात नोंदणी करू द्या, त्यानंतर अधिक सखोल अभ्यासाच्या वर्गासाठी जोडीला त्याच्या वर्गातील सदस्यांना आमंत्रित करा! धार्मिक सभा नवीन नेत्यांना नियुक्त करणार आहे का? सदस्यांना आपला 1 आणि 2 तीमथ्य आणि तिता अभ्यासक्रम घेण्यासाठी प्रोत्साहन द्या! तुम्हाला नवीन ख्रिश्चनांमध्ये बायबलच्या अभ्यासाची जीवनभराची सवय जोपासण्यात मदत करायची आहे का? आमचे ख्रिस्ताचे जीवन आणि कृत्ये हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी उत्तम आहेत!
 • त्यांना महिलांच्या वर्गासाठी वापरा ज्या दीर्घकाळ त्यांच्या बायबलच्या अभ्यासात अधिक सखोल जाऊ इच्छितात.
 • त्यांना उच्च माध्यमिक शाळेतील गटांबरोबर उन्हाळयाच्या सुट्टीत वापरा, कदाचित एखाद्या मैत्रीपूर्ण स्पर्धेसह किंवा विशिष्ट श्रेणीसह उत्तीर्ण होण्यासाठी एक प्रकारचे प्रोत्साहन म्हणून. आम्ही या वयोगटासाठी गॉस्पेल्स किंवा कृत्ये यांवरील अभ्यासक्रम सुचवितो.
 • मोठी मुले असलेली जोडपी आणि कुटुंबे हे अभ्यासक्रम एकाचवेळी घेऊ शकतात आणि अभ्यास व चर्चेसाठी वारंवार एकत्र येऊ शकतात.
 • स्थानिक ख्रिश्चन धर्मतत्त्वांचा संपर्क बिंदू म्हणून ते वापरा. कधीकधी लोक “अभ्यास गटाचा” भाग असण्यात आनंद मानतात ज्यांना इतरवेळी सुरूवातीला वैयक्तिक बायबल अभ्यासात किंवा एखादी विशिष्ट प्रार्थना सेवेस उपस्थित राहण्यात स्वारस्य नसेल. या मार्गाने, ते या अभ्यासक्रमात शिकविल्या जाणार्‍या गोष्टी शिकतील, मीटिंगमधील चर्चेत सहभागी होतील आणि इतरांसमवेत जवळीक निर्माण होईल जे पुढील अभ्यासाकडे नेऊ शकते. समुदायातील असे लोक शोधण्याचा प्रयत्न करा ज्यांना बायबलच्या सखोल अभ्यासक्रमांमध्ये स्वारस्य असेल. ज्या लोकांना विशिष्ट चर्चच्या इमारतीत येण्याबद्दल चिंता वाटत असेल तर तुमच्या मिटिंग्ज, सार्वजनिक जागेसारख्या “तटस्थ” ठिकाणी आयोजित करण्याचा विचार करा.
 • मिशनच्या क्षेत्रात या अभ्यासक्रमांचा उत्कृष्ठ वापर केला जाऊ शकतो. बर्‍याचदा धार्मिक प्रशिक्षण दुर्मिळ असते किंवा अनेक ठिकाणी उपलब्ध नसते, पण हा कार्यक्रम संपूर्ण जगभरात 23 भाषांमध्ये उपलब्ध आहे. आमचा अभ्यासक्रम पुरवीत असलेल्या बायबलच्या सखोल अभ्यासाने तरुण धार्मिक मंडळींना खूपच फायदा होईल. एक स्थानिक शाळा स्थापन केल्यामुळे, त्यांना चांगल्या अभ्यासाच्या सवयी विकसित करण्यात प्रोत्साहन देण्यासाठी विशेषत: मदतगार ठरेल.  तुम्ही मदत करीत असलेल्या धर्मप्रसारकांना या कार्यक्रमाची माहिती करून दिल्याची खात्री करा!
 • आमचे अभ्यासक्रम इतर कार्यक्रमांना पूरक अभ्यासक्रम म्हणूनही वापरता येऊ शकतात. उदाहरणार्थ, विदेशातील प्रेषित प्रशिक्षण कार्यक्रमासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांना त्या कार्यक्रमातील एकूण शिक्षण पूर्ण करण्यासाठी आमच्या अभ्यासक्रमांतील विशिष्ट घ्यावा लागू शकत असेल.

मी सुरुवात कशी करू?

कोणालातरी (कदाचित स्वत:) गटाचा “प्रमुख” म्हणून सेवा करण्यासाठी शोधा जो सुसंघटित, प्रोत्साहन देणारा आणि थ्रू द स्क्रिप्चर्ससह बायबल शिकण्यास उत्सुक असलेला हवा. प्रमुखाची खालील चार कामे असतील:

 1. गटात सहभागी करण्यासाठी लोक नेमणे.
 2. गटाच्या चर्चांचे आयोजन करणे.
 3. गटाला कार्याप्रती कटिबद्ध असण्यात प्रोत्साहन देणे.
 4. गटाच्या सदस्यांना गरजेनुसार अभ्यासक्रमासह मदत करणे जसे की कॉम्प्युटर वापरण्यात मदत करणे, ThroughTheScriptures.com वर खाते तयार करणे आणि इतर ऑनलाइन कार्ये.

सहभागी होण्यात स्वारस्य असलेल्या लोकांना मी कसे शोधू?

बोला. संमेलनात घोषणा करा आणि चर्चच्या अहवालांमध्ये, पॉवर पॉइंट सादरीकरणे घोषणा आणि तुमच्या चर्चच्या वेबसाइटवर घोषणा छापा. लोकांना सहभागी करून घेण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग म्हणजे संभाव्य स्वारस्य असलेल्या लोकांशी वैयक्तिकपणे बोलणे. इतर धार्मिक सभांमध्ये सुद्धा जा. शक्य असल्यास, प्रत्येक धार्मिक सभेत एखाद्याला शोधा ज्याला तुमचे म्हणणे त्याच्या धार्मिक मंडळात पसरविण्यात तुमची मदत करण्यासाठी प्रेरणा मिळालेली असेल.  तुम्हाला चर्चबाहेरील लोकांना आमंत्रित करावे असे देखील वाटत असेल. प्रभूच्या चर्चचे सदस्य नसलेले अनेकजण असू शकतील ज्यांना अशा प्रकारच्या बायबलच्या अभ्यासात स्वारस्य असू शकेल आणि त्यांना तुमच्यासह सहजपणे बायबल शिकण्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकेल. चर्चच्या गुरुजनांशी बोलून विशेषत: बायबलचा अभ्यास करण्यात कोणाला स्वारस्य आहे ते शोधा आणि त्याला स्वत:साठी एखादा अभ्यासक्रम करून पाहण्याबद्दल सुचवा.  जर त्याने एक अभ्यासक्रम पूर्ण केला तर शाळा अंमलात आणण्यात तो संभवत: तुमचा सर्वात मोठा समर्थक असेल. जे सदस्यांना भाग घेऊ इच्छितात त्यांच्यातील एखाद्यासाठी किंवा सर्वांसाठी पहिल्या अभ्यासक्रमासाठी पैसे देण्याची धार्मिक मंडळाची इच्छा असू शकते. यामुळे आर्थिक बोजा असलेल्यांपुढची संभाव्य अडचण दूर होऊ शकते. धार्मिक मंडळ, प्रत्येक अभ्यासक्रम विशिष्ट श्रेणीसह उत्तीर्ण होणार्‍यांना अभ्यासक्रमासाठी पैसे देणे सुरू ठेवू शकते, जे बायबलच्या अभ्यासातील चालू व्यासंगास प्रोत्साहन देईल.


मला स्वारस्य असणारे लोक एकदा सापडले की त्यानंतर आम्ही काय करायचे?

गट एकत्रितपणे कोणते TTS अभ्यासक्रम घेणार आहे याबद्दल एकमत करा आणि एक विशिष्ट दिवस नियोजित करा ज्यादिवशी प्रत्येकजण अभ्यासक्रम सुरू करेल ज्यामुळे तुम्ही एकत्रितपणे शिकू शकाल. ज्यांना कुणाला समस्या असेल त्यांना मदत करा आणि साइन अप कसे करायचे याबद्दल स्पष्ट करून सांगा. एक साप्ताहिक चर्चा आयोजित करा. काही गट चर्चमधील प्रार्थना सेवेच्या एक तास आधी भेटण्याचे निवडतात. इतर आठवड्याच्या शेवटी किंवा काही इतर वेळ निवडतात. जे सहभागी होऊ इच्छितात त्यांना सर्वोत्तम असणारी वेळ निवडण्याचा प्रयत्न करा. हेच ठिकाणाच्या बाबतीत लागू होते: कोणाला चर्चच्या इमारतीत भेटायला आवडते तर कोणाला सदस्यांच्या घरी किंवा इतर ठिकाणी भेटायला आवडते.


साप्ताहिक चर्चांना आम्ही काय करतो?

एकूण ध्येय अभ्यासक्रमांचा अभ्यास करताना सहाय्य करणे आणि प्रोत्साहन देणे हे आहे. परीक्षांची तयारी करताना तुम्ही अभ्यास मार्गदर्शक वाचायला हवेत, अवघड विषय समजून घेण्यात एकमेकांना मदत करायला हवी. बरेचसे गट या वेळाचा वापर, आदर्श रीतीने अभ्यासक्रमातून त्या आठवड्यात शिकलेल्या गोष्टींमधून घेतलेला एक भक्तिपूर्ण संदेश सामील करण्यासाठी करतात. दर आठवड्याला वेगवेगळे लोक भक्तिपूर्ण संदेश आळीपाळीने सादर करू शकतात. तुमच्या साप्ताहिक मीटिंग्जचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सहभागिता आणि परस्पर सद्भाव यांना प्रोत्साहन देणे ज्यामुळे तुम्हाला कधीतरी इतर उपक्रम जसे की कॉफी, नाश्ता किंवा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर जेवणाचा आनंद घेणे या गोष्टींचा समावेश करू शकता. फक्त याची काळजी घ्या की या अतिरिक्त गोष्टींची संयोजने तुमचे लक्ष मुख्य हेतूपासून दूर नेणार नाहीत किंवा लोक सोडून जातील अशा वेळेपर्यंत आव्हानात्मक बनणार नाहीत.


या कल्पना फक्त सुचविलेल्या आहेत. या कार्यक्रमाचे सौंदर्य हे आहे की आम्ही मूळ साहित्य तुम्हाला पुरवितो जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार स्थानिक शाळांमध्ये स्थापित करू शकता. आमच्या कल्पनांपैकी एखादी किंवा तुमची स्वत:ची कल्पना विशेषत: चांगली काम करते का? आम्हाला त्याबद्दल ऐकायला आवडेल! कृपया आम्हाला आमच्या प्रतिक्रिया पानामधून कळवा.