वापराच्या अटी

सॉफ्टवेअर, साहित्य, परस्परसंवादी वैशिष्ठ्ये आणि ThroughTheScriptures.com (“वेबसाइट”) ही वेबसाइट वापरुन किंवा इतरांना वापरण्याची परवानगी देऊन, तुम्ही (“वापरकर्ता”) या कायदेशीर अटी आणि शर्तींशी (“करार”) बांधील असल्याचे मान्य करता. वेबसाइटशी कोणत्याही मार्गाने परस्परसंपर्क करणारी कोणतीही व्यक्ती या कराराच्या हेतूंसाठी वापरकर्ता आहे. जर तुम्हाला या करारातील अटी आणि शर्ती मान्य नसतील तर, तुम्हाला ही वेबसाइट वापरण्याचा अधिकार नाही. जर तुम्ही वेबसाइट, वेबसाइटमधील कोणतीही सामग्री किंवा या कराराच्या अटी आणि शर्ती याबद्दल असमाधानी असाल तर तुम्ही हे मान्य करता की तुमचा एकमेव आणि विशिष्ट उपाय म्हणजे या वेबसाइटचा तुमचा वापर बंद करणे हा आहे. तुम्ही हे कबूल करता आणि स्वीकारता की तुम्ही ही वेबसाइट तुमच्या स्वत:च्या जोखमीवर वापरत आहात. तुम्हाला किंवा तुम्ही प्रतिनिधित्व करीत असलेल्या पक्ष यांना हा करार स्वीकारण्याची कायदेशीर क्षमता आणि अधिकार आहे याचे तुम्ही प्रतिनिधित्व करता. या करारातील काही अटी तुमच्या वेबसाइटच्या वापराकरिता लागू होऊ शकणार नाहीत; तथापि, सर्व लागू अटी या बंधनकारक आहेत. वेबसाइटचे न्याय्य मालक म्हणून ट्रूथ फॉर टूडे वर्ल्ड मिशन स्कूल, इंक. (“Truth for Today”) हे त्यांचा एकमेव हक्क आणि कोणत्याही वेळी आणि वेळोवेळी तुम्हाला ThroughTheScriptures.com कोणतीही सूचना न देता या करारातील अटी बदलण्याचा किंवा खंडित करण्याचा निर्णय घेण्याचे मुक्त स्वातंत्र्य राखून ठेवते. पूर्णपणे येथे मांडलेले असे कोणतेही बदल याद्वारे या करारात संदर्भाने समाविष्ट केले जातात.

समाप्ती. हा करार संपेपर्यंत लागू राहील. तो ट्रूथ फॉर टूडेच्या स्वत:च्या निर्णय स्वातंत्र्यानुसार आणि कोणत्याही आगावू सूचनेशिवाय किंवा पक्षांमधील परस्पर लेखी करारांनुसार समाप्त होऊ शकते, पण वापरकर्त्याद्वारे नाही. ट्रूथ फॉर टूडे कोणत्याही आगावू सूचनेशिवाय आणि ट्रूथ फॉर टूडे यांच्या स्वत:च्या आणि निर्णय घेण्याच्या मुक्त स्वातंत्र्यानुसार, वापरकर्त्याचा वेबसाइटपर्यंतचा प्रवेश स्थगित करू शकते, समाप्त करू शकते किंवा हटवू शकते. अशी कोणतीही स्थगिती, समाप्ती किंवा हटविणे किंवा त्याच्या परिणाम, व्यवसाय किंवा शिक्षणातील अडथळा, डेटा किंवा मालमत्ता गमावणे, मालमत्तेचे नुकसान किंवा इतर कोणतेही दु:ख, तोटे किंवा नुकसान यांच्यासह परंतु यापुरते मर्यादित नसलेल्यासाठी ट्रूथ फॉर टूडे जबाबदार असणार नाहीत. जर तुम्ही किंवा वेबसाइट वापरणारी इतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था या करारातील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन केले तर, ट्रूथ फॉर टूडे हे एकतर्फीपणे आणि सूचनेशिवाय हा करार आणि तुमचा वेबसाइटपर्यंतचा प्रवेश समाप्त करू शकतात. ट्रूथ फॉर टूडे हे तुमच्या किंवा कोणत्याही तृतीय पक्षाच्या कोणत्याही समाप्तीसाठी जबाबदार नसतील. समाप्तीनंतर, तुम्ही किंवा इतर कोणतीही व्यक्ती किंवा पक्ष तुमच्या स्वत:च्या मूल्याने आणि खर्चाने वेबसाइट वापरणे थांबवाल.

अद्यतने. ट्रूथ फॉर टूडे त्यांच्या पर्यायाने, वेळोवेळी, वेबसाइटच्या अद्यतनीत आवृत्त्या काढू शकतील. अन्यथा स्पष्टपणे नमूद केले नसल्यास, अशी कोणतीही अद्यतने या करारातील कोणत्याही फेरफारांसह या कराराच्या अटींच्या अधीन असतील आणि ट्रूथ फॉर टूडेच्या स्वत:च्या निर्णय स्वातंत्र्यानुसार ठरविली जातील.

मालकीचे साहित्य. डिजाइन्स, मजकूर, ग्राफिक्स, चित्रे, व्हिडिओ, माहिती, अनुप्रयोग, सॉफ्टवेअर, संगीत, आवाज आणि इतर फाइल्स आणि त्यांची निवड व रचना (“साइटची सामग्री”) तसेच सर्व सॉफ्टवेअर आणि वेबसाइटमध्ये समाविष्ट किंवा संबंधित साहित्य यांच्यासह वेबसाइटवरून उपलब्ध असलेले सर्व साहित्य हे कॉपीराइट्स, ट्रेडमार्क्स, सर्विस मार्क्स, पेटंट्स, ट्रेड सीक्रेट्स किंवा इतर मालकी हक्क आणि कायद्यांनी सुरक्षित केलेले आहे. तुम्ही अशी सामग्री किंवा साहित्य विकणे, परवाना देणे, भाड्याने देणे, बदलणे, वितरित करणे, कॉपी करणे, पुनर्निर्माण करणे, संचार करणे, सार्वजनिक प्रदर्शन, सार्वजनिक सादरीकरण, छापणे, फेरफार करून वापरणे, संपादित करणे किंवा त्यावर आधारलेले निर्माण करणे हे न करण्याचे मान्य करता. वेबसाइटवरील सामग्रीचा संग्रह, संकलन, मनोरंजन, डेटाबेस किंवा निर्देशिका तयार करण्यासाठी किंवा संग्रह करण्यासाठी वेबसाइटवरील डेटा किंवा इतर सामग्री पद्धतशीरपणे प्राप्त करणे येथे पुरविलेले वगळता प्रतिबंधित आहे.

हमीची अस्वीकृती.
वेबसाइट “जशी आहे तशी” सर्व चुकांसह आणि कोणत्याही प्रकारच्या हमीशिवाय पुरविलेली आहे. ट्रूथ फॉर टूडे व्यक्त, सूचित किंवा वैधानिक यांच्यासह परंतु यापुरत्या मर्यादित नसलेल्या व्यापारी, समाधानकारक गुणवत्तेच्या, विशिष्ट हेतुसाठीच्या तंदरूस्तीच्या, अचूकतेच्या, शांत आनंदाच्या आणि तृतीय पक्षांच्या हक्कांच्या गैर-उल्लंघनाच्या सूचित हमींचा वेबसाइटशी संबंधित सर्व हमींचा अस्वीकार करते. ट्रूथ फॉर टूडे अशी कोणतीही हमी, खात्री देत नाही किंवा असे दर्शवीत नाही की वेबसाइट एका विशिष्ट वेळी किंवा ठिकाणी उपलब्ध असेल, कोणतेही दोष किंवा चुका दुरुस्त केल्या जातील किंवा सामग्री व्हायरसमुक्त किंवा इतर हानिकारक घटकांनी मुक्त असेल. तुम्ही वेबसाइटची गुणवत्ता, परिणाम आणि कामगिरी संपूर्ण तसेच सर्व सेवा, दुरुस्त्या किंवा सुधार यांचा खर्च या जोखमीला गृहीत धरू शकता. ट्रूथ फॉर टूडे, त्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांचे कर्मचारी हे कोणतीही तोंडी किंवा लेखी माहिती, सल्ला, सूचना किंवा शिफारसी यांची हमी तयार करणार नाहीत किंवा कोणत्याही मार्गाने या कराराचा आवाका वाढविणार नाहीत आणि तुम्ही अशा कोणत्याही माहिती, सल्ला, सूचना किंवा शिफारसी यांवर अवलंबून राहू नका. काही न्यायक्षेत्रे काही हमी किंवा ग्राहक हक्क यांना वगळण्याची किंवा त्यांवर मर्यादा घालण्याची परवानगी देत नाहीत. अशा कोणत्याही न्यायक्षेत्रातील कायद्यांच्या मर्यादेपर्यंत तुमचा वेबसाइटचा वापर, काही वगळणे आणि मर्यादा तुमच्यासाठी लागू होणार नाहीत.

दायित्वाची मर्यादा. तुम्ही हे मान्य करता की ट्रूथ फॉर टूडे आणि त्यांचे संचालक, अधिकारी, एजंट, कंत्राटदार, भागीदार आणि कर्मचारी हे तुमच्यासाठी किंवा कोणत्याही तृतीय पक्षासाठी, थेट, विशेष, आनुषंगिक किंवा प्रासंगिक नुकसान, निधीतील तोटा किंवा मालमत्तेचे नुकसान, व्यवसायात अडथळा, व्यावसायिक संधी गमावणे, डेटा गमावणे, किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दु:ख, नुकसान किंवा यामुळे किंवा यासंबंधी तोटे: वेबसाइटचा वापर किंवा वापरू शकण्याची अक्षमता, कशाही पद्धतीने कारणीभूत झालेली; डेटापर्यंत अनधिकृत किंवा अपघाती प्रवेश किंवा डेटात फेरफार; विधाने किंवा कोणत्याही तृतीय पक्षाची वागणूक; किंवा या वेबसाइटच्या वापरासंबंधी कोणताही मुद्दा; आणि जरी ट्रूथ फॉर टूडेला अशा नुकसानाच्या शक्यतेबद्दल सल्ला देण्यात असला तरीही यांसह परंतु यापुरत्या मर्यादित नसलेल्या नुकसानासाठी जबाबदार असणार नाहीत. काही कार्यक्षेत्रांमध्ये काही उपाय किंवा नुकसान वगळणे किंवा त्यावरील मर्यादांना मान्यता देत नाही. अशा कोणत्याही न्यायक्षेत्रातील कायद्यांच्या मर्यादेपर्यंत तुमचा वेबसाइटचा वापर, काही वगळणे आणि मर्यादा तुमच्यासाठी लागू होणार नाहीत.

नुकसानभरपाई. तुम्ही, वेबसाइटचे वापरकर्ते ट्रूथ फॉर टूडे, त्यांच्या सहाय्यक कंपन्या, संलग्न कंपन्या, पालक, उत्तराधिकारी आणि/किंवा नेमलेले आणि त्यांच्या संचालक, अधिकारी, एजंट, कंत्राटदार, भागीदार आणि कर्मचारी यांपैकी प्रत्येकाचा, या करारापासून उद्भवलेल्या किंवा या वेबसाइटच्या कोणत्याही ताब्याशी, वापराशी आणि कार्याशी संबंधित किंवा या करारात वर्णन केलेल्या वेबसाइटशी संबंधित माहितीच्या प्रेषणामुळे किंवा ती नसण्यामुळे, वापरकर्त्याकडून किंवा कोणताही ग्राहक, वापरकर्ते, विद्यार्थी किंवा इतरांकडून वेबसाइटचे कोणतेही नुकसान, तोटे किंवा कोणत्याही मालमत्तेच्या नुकसानाशी किंवा डेटा गमावण्यासंबंधित कोणत्याही प्रकारचे उत्तरदायित्व यासह परंतु यापुरते मर्यादित नसलेले कोणतेही नुकसान, उत्तरदायित्व, दावा, मागणी, किंमती आणि खर्च, वकिलांच्या रास्त शुल्कासह नुकसान भरपाई पासून बचाव करण्याचे मान्य करता आणि निर्दोष मानता.

कायदा आणि वादविवादांना नियंत्रित करणे. हा करार अर्कांसास राज्य आणि यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्या कायद्यांनुसार व्यवस्था पाहील. तुम्ही हे समजता आणि मान्य करता की वेबसाइटच्या वापरात आंतरराज्य डेटा प्रेषणे समाविष्ट असू शकतात ज्यांना फेडरल कायद्याच्या अंतर्गत आंतरराज्य व्यापाराचा व्यवहार मानला जाऊ शकतो. या करारामुळे उद्भवू शकणारा कोणताही वादविवाद किंवा दावा हा पक्षांमधील बोलणीने सोडविता येऊ शकत नाही, यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील, अर्कांसास राज्यातील परस्परमान्य मध्यस्थी प्रशासित मध्यस्थीमार्फत दोन्ही पक्ष सद्भावनेने दावा सोडविण्याचा प्रयत्न करतील. जर कराराशी किंवा वेबसाइटशी संबंधित कायदेशीर कारवाई असेल तर, ती व्हाइट काऊंटी, अर्कांसास येथील राज्य कोर्ट या ठिकाणी किंवा ईस्टर्न डिस्ट्रिक्ट ऑफ अर्कांसास साठीच्या यूनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्ट या ठिकाणी असेल. वापरकर्ता स्पष्टपणे गैरसोयीच्या कोणत्याही बचावाचा आग्रह सोडून देतो.

संपूर्ण करार. हा करार हा ट्रूथ फॉर टूडे आणि वापरकर्ता यांच्यातील येथे नमूद विषय मुद्द्यासंबंधी संपूर्ण करार आहे आणि तो, या करारात नमूद विषय मुद्द्यासंबंधी सर्व आधीच्या तोंडी अथवा लेखी समजुती, वचने आणि हमी, असल्यास त्यांची जागा घेतो. ट्रूथ फॉर टूडे यांनी कार्यान्वित केल्याखेरीज आणि लेखी पुष्टी केल्याखेरीज या करारातील कोणत्याही भागातील बदल, फेरफार, माफी, समाप्ती किंवा मुक्तता बंधनकारक नसेल.

मालकी. वेबसाइट आणि ट्रूथ फॉर टूडे यांनी पुरविलेले सर्व संबंधित साहित्य हे ट्रूथ फॉर टूडे यांच्या एकमेव मालकीचे आहे किंवा त्यांची योग्य परवानायुक्त मालमत्ता आहे. या कराराच्या अटींच्या अंतर्गत वेबसाइट ही परवानायुक्त आहे, तुम्हाला विकलेली नाही. ट्रूथ फॉर टूडे वेबसाइटची विक्री, पोहोचविणे, हस्तांतरण, किंवा एखादे शीर्षक नेमके, मालकीहक्क किंवा स्वारस्य लागू नाही. वेबसाइट आणि वेबसाइटमध्ये अंतर्भूत केलेले इतर सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स किंवा इतर तृतीय पक्षाच्या मालकीचे साहित्य वापरुन तुम्ही केवळ या कराराच्या अटींनुसार एकाधिकार नसलेल्या, हस्तांतरण होऊ शकत नसलेल्या परवान्यास वापरण्याची मान्यता देता. ट्रूथ फॉर टूडे वेबसाइट आणि सर्व संबंधित साहित्याचे सर्व लागू हक्क, शीर्षक आणि स्वारस्य (कॉपीराइट्स, पेटंट्स, ट्रेडमार्क्स आणि सर्विस मार्क्स आणि इतर व सर्व इतर बौद्धिक मालमत्ता हक्क यांच्यासह परंतु यापुरते मर्यादित नाही) राखून ठेवते आणि स्वत:कडे ठेवते. या उत्पादनासाठी दिलेल्या कोणत्याही मानधनात या वेबसाइटच्या वापराचे परवाना शुल्क समाविष्ट असते.

वापर.

  1. या करारात पुरविल्याव्यतिरिक्त वेबसाइट किंवा त्यातील एखादा भाग कॉपी करणे, पुनर्निर्मित करणे, दुसरी प्रत करणे, भाषांतर, अभियांत्रिक पुनर्निर्माण, अनुकुलन, विखुरणे, विलगीकरण, विरुद्ध संकलन, बदल किंवा फेरफार हे स्पष्टपणे प्रतिबंधित आहेत. वेबसाइट किंवा त्यातील एखाद्या भागाचे कोणत्याही कॉम्प्युटर प्रोग्रॅममध्ये एकत्रीकरण किंवा समावेश आणि वेबसाइट किंवा त्यातील एखाद्या भागापासून साधित कार्यांची किंवा कार्यक्रमांची निर्मितीदेखील, ट्रूथ फॉर टूडेच्या आगावू लेखी परवानगीविना स्पष्टपणे प्रतिबंधित आहे.
  2. वेबसाइटमधील कोणत्याही भागाच्या पुनर्निर्मिती, दुय्यम प्रत, बदल किंवा इतर प्रकारे वापरासाठी परवानगीच्या विनंत्या ट्रूथ फॉर टूडेला या कराराच्या शेवटी दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात पाठविल्या पाहिजेत. कोणतीही दिलेली परवानगी ही ट्रूथ फॉर टूडेच्या एकमेव, मुक्त आणि विशेष निर्णयावर अवलंबून असेल.
  3. वेबसाइट किंवा त्यातील कोणताही भाग कोणत्याही कारणासाठी भाड्याने दिला, भाडेपट्टीवर दिला, विकला, नेमून दिला, हस्तांतरित केला, पुन्हा-परवाना दिला, उप-परवाना दिला किंवा समर्पित केला जाऊ शकत नाही. भाड्याने देणे, भाडेपट्टीवर देणे, नेमणे, हस्तांतरित करणे, पुन्हा-परवाना देणे, उप-परवाना देणे, समर्पण करणे, भेट देणे किंवा इतर व्यवस्था करणे याप्रकारे या कराराचे उल्लंघन करण्याचा कोणताही प्रयत्न हा रद्दबादल आहे. या कराराच्या भंगाची कोणतीही कृती किंवा ती रोखण्यात आलेले अपयश हे नागरी आणि / किंवा फौजदारी खटल्यात होऊ शकते.
  4. ट्रूथ फॉर टूडे यांच्याखेरीज इतर संस्थांनी विकसित केलेले आणि / किंवा त्यांच्या मालकीचे आणि वेबसाइटमध्ये समाविष्ट केलेले किंवा अंतर्भूत केलेले प्रोग्रॅम्स किंवा सॉफ्टवेअर (“तृतीय पक्ष सॉफ्टवेअर”) हे आणि त्यांचा वापर हे या कराराच्या प्रशासनाच्या अधीन आहेत. वेबसाइटच्या संयोगाने तृतीय पक्षाच्या सॉफ्टवेअरचा वापर त्याच्या उद्देशित वापराव्यतिरिक्त इतर हेतूसाठी करणे प्रतिबंधित आहे.

तृतीय पक्षांच्या साइट्स आणि सामग्री. वेबसाइटमध्ये इतर वेबसाइट्सच्या (“तृतीय पक्ष साइट्स”) लिंक्स असू शकतील (किंवा त्याकडे तुम्हाला पाठवू शकतील) तसेच तृतीय पक्षांच्या मालकीचे किंवा त्यांच्याकडून येणारे (“तृतीय-पक्ष सामग्री”) लेख, फोटो, मजकूर, ग्राफिक्स, चित्रे, डिजाइन्स, संगीत, आवाज, व्हिडिओ, माहिती, अनुप्रयोग, सॉफ्टवेअर आणि इतर सामग्री किंवा आयटम्स असू शकतील.  ट्रूथ फॉर टूडे अशा तृतीय पक्षांच्या साइट्स आणि तृतीय पक्षांची सामग्री अचूकता, योग्यता किंवा पूर्णत्व यादृष्टीने तपासत नाही. वेबसाइटवर पोस्ट केलेल्या, त्यांच्यामार्फत उपलब्ध किंवा ती वापरुन कोणत्याही तृतीय पक्षांच्या साइट्समधील सामग्री, अचूकता, आक्षेपार्हता, मते, विश्वासार्हता, गोपनीयता पद्धती किंवा तृतीय पक्षांच्या साइट्स मधील किंवा त्यांची इतर धोरणे किंवा सामग्री यांसहित मिळविलेल्या प्रवेशासाठी ट्रूथ फॉर टूडे जबाबदार नाहीत. कोणत्याही तृतीय पक्ष साइट किंवा तृतीय पक्ष सामग्रीशी लिंक करणे किंवा वापर अथवा स्थापित करण्याची परवानगी देणे यांसाठी ट्रूथ फॉर टूडेची मान्यता किंवा पुष्टी सूचित होत नाही.  जरी काही कॉम्प्युटर्स तृतीय पक्ष साइट्सपर्यंत प्रवेश रोखण्यासाठी सॉफ्टवेअरची गाळणी करण्याचा वापर करू शकत असले तरी, ट्रूथ फॉर टूडे हे वेबसाइटचा वापर करून प्रवेश केलेल्या कोणत्याही तृतीय पक्ष साइट्स किंवा तृतीय पक्ष सामग्रीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदारी किंवा उत्तरदायित्व घेणार नाहीत.

साइटची धोरणे, बदल आणि पृथक्करणीयता
कृपया वेबसाइटवर पोस्ट केलेली आमची इतर धोरणे जसे की गोपनीयता धोरण यांचा आढावा घ्या. ट्रूथ फॉर टूडे हे वेबसाइट, धोरणे आणि वापराच्या अटी यांच्यामध्ये कोणत्याही वेळी बदल करण्याचा हक्क राखून ठेवते. जर वेबसाइटच्या अटी किंवा धोरणांमधील कोणत्याही तरतुदी या अवैध, निरर्थक किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अंमलबजावणी करण्यायोग्य नसल्यास, त्या तरतुदी वेगळ्या करण्याजोग्या मानल्या जातील आणि उरलेल्या तरतुदींच्या वैधतेवर आणि अंमलबजावणीवर परिणाम करणार नाहीत.

संपर्क
वेबसाइटच्या अटी किंवा धोरणांबद्दल तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया येथे संपर्क करा:
Truth for Today World Mission School, Inc.
P.O. Box 2044
Searcy, Arkansas
72145-2044, U.S.A.