ही वेबसाइट Truth for Today World Mission School, Inc. (“ट्रूथ फॉर टूडे”) यांची आहे. तुम्ही या वेबसाइट (“वेबसाइट”) वरून आम्हाला दिलेल्या माहितीचे काळजीपूर्वक रक्षण करून आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो. आमच्यावरील तुमच्या विश्वासाचे आम्ही कौतुक करतो. आम्ही ही माहिती काळजीपूर्वक आणि संवेदनशील रीतीने वापरू ही बांधिलकी तुम्हाला देतो. खालील माहिती हे उघड करते की वेबसाइट कोणती माहिती गोळा करते आणि आम्ही तिचे काय करतो.
वेबसाइटची गोपनीयता
जेव्हा तुम्ही वेबसाइटशी जोडता तेव्हा, आम्ही तुम्हाला इंटरनेटपर्यंत प्रवेश देणार्या कॉप्युटरचा इंटरनेट पत्ता (IP) ओळखू शकतो. आम्ही आयपी पत्त्याचा वापर आमच्या सर्व्हरसहित असलेल्या समस्यांचे निदान करण्यासाठी किंवा इतरवेळी आमची वेबसाइट चालविण्यासाठी करू शकतो. त्याचा वापर व्यापक लोकसंख्याविषयक माहिती गोळा करण्यासाठीही केला जातो. आम्ही तुमच्या आयपी पत्त्याचा संबंध वैयक्तिकपणे तुमच्याशी कधीही जोडणार नाही आणि तो दुसर्या कंपनीला किंवा संस्थेला कधीही देणार नाही.
इतर वेबसाइट्स
वेबसाइटमध्ये इतर इंटरनेट साइट्सच्या लिंक्स सामील असू शकतात ज्या ट्रूथ फॉर टूडे द्वारे संचालित किंवा नियंत्रित केल्या जात नाहीत. आम्ही ट्रूथ फॉर टूडेच्या मालकीच्या नसलेल्या साइट्सच्या गोपनीयता पद्धतींसाठी किंवा सामग्रीसाठी जबाबदार नाही किंवा जबाबदार ठरविले जाऊ शकत नाही. तुम्ही भेट देत असलेल्या प्रत्येक वेबसाइटचे गोपनीयता धोरण तुम्ही वाचावे यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो.
माहितीचा वापर किंवा प्रकटीकरण
आम्ही कोणतीही वैयक्तिक ओळख पटणारी माहिती गोळा करीत नाही जोवर तुम्ही ती नोंदणी फॉर्म, ऑर्डर फॉर्म, सर्वेक्षण फॉर्म किंवा ईमेल द्वारे आम्हाला पाठविलेली नसते. वेबसाइट तुम्हाला आम्हाला संपर्क माहिती (जसे की तुमचा ईमेल पत्ता किंवा पोस्टाचा पत्ता), आर्थिक माहिती (जसे की तुमचा खाते क्रमांक किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक) आणि लोकसंख्याविषयक माहिती (जसे की तुमचा पिन कोड किंवा वय) देण्यासाठी विचारू शकते किंवा ती आवश्यक असू शकते. आम्ही या माहितीचा वापर तुम्ही विनंती केलेली उत्पादने किंवा सेवा यांची माहिती पुरविण्यासाठी करतो. कोणतीही गोळा केलेली माहिती ही प्रामुख्याने ट्रूथ फॉर टूडेच्या अंतर्गत वापरासाठी असते आणि ती कोणत्याही बाह्य गटाला किंवा संस्थेला उपलब्ध करून दिली जात नाही अपवाद फक्त तुमचे नाव किंवा पोस्टाच्या पत्त्याचा, जो एखाद्या तृतीय पक्षाला तुम्ही वेबसाइटवरून ऑर्डर केलेली उत्पादने पाठविण्यासाठी दिला जाऊ शकतो.
वैयक्तिक ओळख पटणारी माहिती आणि लोकसंख्याविषयक माहिती (जसे की नाव, पोस्टाचा पत्ता, ईमेल पत्ता, दूरध्वनी क्रमांक इ.) पुरविण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. आम्ही तुम्हाला ही माहिती सादर करण्यासाठी प्रोत्साहन देतो ज्यामुळे आम्ही जे आमचे वापरकर्ते आहेत त्यांना अधिक चांगले समजून घेऊ शकतो.
जर तुम्ही वैयक्तिक ओळख पटणारी माहिती या साइटला पुरवलीत तर, जोवर आम्ही संकलनाच्या वेळी तसे नमूद करत नाही तोवर आम्ही अशी माहिती इतर सक्रियपणे गोळा केलेल्या माहितीबरोबर एकत्रित करू. आम्ही तृतीय पक्षांकडे तुमची वैयक्तिक ओळख पटणारी माहिती उघड करू शकतो, परंतु फक्त या बाबतीत:
- आमच्या व्यवसायात सहाय्य करण्यासाठी आम्ही वापरत असलेल्या कंत्राटदारांना (जसे की संशोधन पुरवठादर आणि तांत्रिक सहाय्य), या बाबतीत आम्हाला अशा तृतीय पक्षांनी या गोपनीयता धोरणाच्या अनुसार वागणूक देण्यास मान्यता देण्याची आणि त्याच हेतूंसाठी ती वापरण्याची आवश्यकता असते;
- कायद्याच्या अंमलबजावणीच्या विनंत्यांना प्रतिसाद देण्यासाठी किंवा जिथे लागू कायदे, कोर्टाच्या ऑर्डर्स किंवा सरकारी नियमनांमुळे आवश्यक असते.
या गोपनीयता धोरणात विचार केलेल्या माहितीचे संकलन, वापर आणि प्रकटीकरण यांमध्ये तुमच्या राहत्या देशाबाहेरील अधिकारक्षेत्रांमध्ये माहितीचे हस्तांतरण सामील असू शकते ज्यामध्ये वैयक्तिक ओळख पटणार्या माहितीविषयी समान कायदे आणि नियम नसू शकतील. ही माहिती देऊन, तुम्ही या गोपनीयता धोरणाच्या अनुसार अशा हस्तांतरणांना आणि प्रकटीकरणांना अनुमती देता.
ऑनलाइन ट्रॅकिंग
आमच्या वेबसाइट्स “डू नॉट ट्रॅक” (मागोवा घेऊ नका) सिग्नल्स किंवा तत्सम यंत्रणांना सध्या प्रतिसाद देत नाहीत. “माहितीचा वापर आणि प्रकटीकरण” आणि “कुकीज” या विभागांमध्ये वर्णन केल्यानुसार, आम्ही तुमच्या तृतीय-पक्ष वेबसाइट्स वरील गतीविधींचा मागोवा घेणारे सॉफ्टवेअर वापरू शकतो जे वेबसाइटवरील तुमचा अनुभव विस्तृत करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या तृतीय-पक्ष वेबसाइट्स किंवा ऑनलाइन सेवांवरील गतीविधींचा मागोवा घेऊ शकते.
प्रवेश, दुरूस्ती आणि अद्यतन
तुमची वैयक्तिक ओळख पटणारी माहिती अचूक, अद्ययावत आणि पूर्ण ठेवण्यासाठी, कृपया तुमची माहिती ट्रूथ फॉर टूडेच्या नोंदीत वेबसाइटवर सर्व नवीन संपर्क माहिती आणि वैयक्तिक ओळख पटणार्या माहितीसह योग्य ते फॉर्म भरून अद्यतनीत करा.
डेटा सुरक्षितता
आम्ही आमच्याकडे, संचारादरम्यान आणि एकदा आम्हाला मिळाल्यावर दोन्हीवेळा सादर केलेल्या वैयक्तिक माहितीचे गमावणे, गैरवापर आणि अनधिकृत प्रवेश, प्रकटीकरण, बदल किंवा नष्ट करणे यांपासून संरक्षण करण्यासाठी सर्वसाधारणपणे उद्योगातील स्वीकारलेल्या प्रमाणकांचे पालन करतो. हे ध्यानात घ्या की इंटरनेटवरील कोणताही संचार अद्याप सुरक्षित किंवा त्रुटी-मुक्त नाही. विशेषत:, साइटवरून किंवा साइटला पाठविलेल्या ईमेल सुरक्षित नसू शकतात. त्यामुळे, तुमच्या माहितीचे रक्षण करण्यासाठी आम्ही व्यावसायिक स्वीकारार्ह मार्ग वापरण्याचा प्रयत्न करीत असलो तरीही, आम्ही नि:संशय सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही. तुमची वैयक्तिक माहिती (नाव, ईमेल पत्ता इ.) अद्यतनीत करण्यासाठी तुमचा ईमेल पत्ता आणि पासवर्ड आवश्यक असेल. तुमचा पासवर्ड खाजगी आणि सुरक्षित ठेवा; तो कोणाशीही शेअर करू नका. वेबसाइटवरील सुरक्षिततेबाबत तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क करा.
ईमेल्स
ट्रूथ फॉर टूडे वरून तुम्हाला मिळणार्या ईमेल्स या फक्त साइटवरील तुमच्या गतीविधीवर आधारित असतील, उदाहरणार्थ, अभ्यासक्रम विकत घेणे किंवा पूर्ण करणे.
कुकीज
कुकी ही एक छोटी टेक्स्ट फाइल असते जी वापरकर्त्याच्या कॉम्प्युटरवर नोंद ठेवण्याच्या हेतूंनी साठविलेली असते. आम्ही वेबसाइटवर कुकीज वापरतो. तुम्ही वेबसाइटवर असताना सादर केलेली कोणतीही वैयक्तिक ओळख पटणारी माहिती आम्ही कुकीजमध्ये साठवून ठेवणार्या माहितीशी जोडत नाही. आम्ही नियमित कुकीज वापरतो. नियमित कुकी तुमच्या हार्ड ड्राइव्हवर जास्त कालावधीसाठी राहते. तुम्ही तुमच्या इंटरनेट ब्राऊजरच्या “हेल्प” फाइलमध्ये पुरविलेल्या निर्देशांचे पालन करून नियमित कुकीज हटवू शकता. जर तुम्ही कुकीज नाकारल्या तरीही तुम्ही वेबसाइट वापरू शकता, पण वेबसाइटवरील काही भाग वापरण्याच्या तुमच्या क्षमतेवर मर्यादा येऊ शकेल. उदाहरणार्थ, कुकीज सक्रिय केल्याशिवाय वापरकर्ता अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकत नाही किंवा लॉगिन करू शकत नाही.
गैर-इलेक्ट्रॉनिक संपर्क
आम्ही आमच्या वतीने इतर कंपन्यांना पत्रव्यवहार करण्यासाठी नेमू शकतो. त्यांना त्यांची कामे करण्यासाठी वैयक्तिक माहितीपर्यंत प्रवेश गरजेचा असू शकतो, पण ते इतर हेतूंसाठी ती वापरू शकत नाहीत.
गोपनीयता धोरणातील बदल
आम्ही वेबसाइटवर या विधानाची सुधारित आवृत्ती पोस्ट करून या गोपनीयता धोरणात कोणत्याही वेळी बदल करण्याचा किंवा अद्यतनीत करण्याचा हक्क राखून ठेवतो. या धोरणाचा नियमितपणे संदर्भ घ्या. जर आम्ही वैयक्तिक ओळख पटणारी माहिती ती गोळा करतेवेळी नमूद केल्यापेक्षा वेगळ्या मार्गाने वापरण्याचे ठरविले तर, आम्ही तुम्हाला वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर किंवा ईमेल द्वारे सूचित करू.
आमच्याशी संपर्क कसा करायचा
ट्रूथ फॉर टूडे ही तुमच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यास बांधील आहे. कारण की तुमच्या गोपनीयतेचे रक्षण करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, आमच्या गोपनीयता धोरणाबद्दलच्या तुमच्या चिंता तुम्ही नेहमीच आम्हाला पाठवू शकता. ट्रूथ फॉर टूडे त्वरेने सर्व रास्त शंका आणि चौकशांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करेल.
Truth for Today World Mission School, Inc.
P.O. Box 2044
Searcy, Arkansas
72145-2044, U.S.A.